भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुंगीचिया घरा कोण जाय मूळ । देखोनियां गूळ धांव घाली

mungichiya ghara kon jay mul | dekhoniyan gul dhanv ghali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मुंगीचिया घरा कोण जाय मूळ । देखोनियां गूळ धांव घाली ॥१॥ याचकाविण काय खोळंबला दाता । तोचि धांवे हिता आपुलिया ॥ध्रु.॥ उदक अन्न काये म्हणे मज खा ये । भुकेला तो जाये चोजवीत ॥२॥ व्याधी पिडिला धांवे वैद्याचिया घरा । दुःखाच्या परिहारा आपुलिया ॥३॥ तुका म्हणे जया आपुलें स्वहित। करणें तोचि प्रीत धरी कथे ॥४॥