भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुंगी आणि राव । आम्हां सारिखाची जीव

mungi ani rav | amhan sarikhachi jiv

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मुंगी आणि राव । आम्हां सारिखाची जीव ॥१॥ गेला मोह आणि आशा । कळिकाळाचा हा फांसा ॥ध्रु.॥ सोनें आणि माती । आम्हां समान हें चित्तीं ॥२॥ तुका म्हणे आलें । घरा वैकुंठ सांवळें ॥३॥