भजनी मालिका
← भजनांकडे परत

मूळ ना डाळ शाखा ना पल्लव । तो हा कैसा देव आलां घरीं

mul na dal shakha na pallav | to ha kaisa dev alan gharin

मूळ ना डाळ शाखा ना पल्लव । तो हा कैसा देव आलां घरीं ॥१॥ निर्गुणपणें उभा सगुणपणें शोभा । जिवाशिवा प्रभा दाविताहे ॥ध्रु०॥ नकळे याची गती नकळे याची लीळा । आपिआप सोहळा भोगीतसे ॥२॥ ज्ञानदेव म्हणे न कळे याची थोरी । आपण चराचरीं नांदतसे ॥३॥