भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुखीं नाम हातीं मोक्ष । ऐसी साक्ष बहुतांसी

mukhin nam hatin moksha | aisi saksha bahutansi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मुखीं नाम हातीं मोक्ष । ऐसी साक्ष बहुतांसी ॥१॥ वैष्णवांचा माल खरा । तुरतुरा वस्तूसी ॥ध्रु.॥ भस्म दंड न लगे काठी । तीर्थां आटी भ्रमण ॥२॥ तुका म्हणे आडकाठी । नाहीं भेटी देवाचे ॥३॥