भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुखें बोले ब्रम्हज्ञान । मनीं धनअभिमान

mukhen bole bramhadnyan | manin dhanaabhiman

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मुखें बोले ब्रम्हज्ञान । मनीं धनअभिमान ॥१॥ ऐशियाची करीता सेवा । काय सुख होय जीवा ॥ध्रु.॥ . पोटासाठीं संत । झाले कलींत बहुत ॥२॥ विरळा ऐसा कोणी । तुका त्यासि लोटांगणी ॥३॥