भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुखें बोलावें तें जीविंचें जाणसी । विदित पायांपाशीं सर्व आहे

mukhen bolaven ten jivinchen janasi | vidit payampashin sarva ahe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मुखें बोलावें तें जीविंचें जाणसी । विदित पायांपाशीं सर्व आहे ॥१॥ आतां हें चि भलें भाकावी करुणा । विनियोग तो जाणां तुह्मी याचा ॥ध्रु.॥ आपलें तों येथें केलें नव्हे कांहीं । साधनाचा वांहीं पडों नये ॥२॥ तुका म्हणे देह दिला पिंडदान । वेळोवेळां कोण चिंता करी ॥३॥