भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुकें होतां तुझ्या पदरीचें जातें । मूर्ख तें भोगितें मीमीपण

muken hotan tujhya padarichen jaten | murkha ten bhogiten mimipan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मुकें होतां तुझ्या पदरीचें जातें । मूर्ख तें भोगितें मीमीपण ॥१॥ आपुलिये घरीं मैंद होऊनी बसे । कोणासीहि ऐसे बोलों नको ॥२॥ तुका म्हणे तुम्हां सांगतों मी खूण । देवासी तें ध्यान लावुनि बैसा ॥३॥