भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुदल जतन झालें । मग लाभाचें काय आलें

mudal jatan jhalen | mag labhachen kay alen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मुदल जतन झालें । मग लाभाचें काय आलें ॥१॥ घरीं देउनि अंतर गांठी । राख्या पारिख्यां न सुटे मिठी ॥ध्रु.॥ घाला पडे थोडें च वाटे । काम मैंदाचें च पेटे ॥२॥ तुका म्हणे वरदळ खोटें । फांसे अंतरिंच्या कपटें ॥३॥