भजनी मालिका
← भजनांकडे परत

मृत्युचेनि मापें जे जे प्राणी

mrutyucheni mapen je je prani

मृत्युचेनि मापें जे जे प्राणी । तयाची शिराणी यम करी ॥१॥ यम नेम धर्म आम्हां नाहीं कर्म । अवघेंचि ब्रह्म होउनि ठेलों ॥२॥ द्वैतभाव ठेला अविनाश संपन्न आपेंआप जनार्दन येईल घरा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे काज सरलें संसारी । चारीही मापारी गिळुनि ठेलों ॥४॥