भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोलें घातलें रडाया । नाहीं असुं आणि माया

molen ghatalen radaya | nahin asun ani maya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मोलें घातलें रडाया । नाहीं असुं आणि माया ॥१॥ तैसा भक्तीवाद काय । रंगबेगडीचा न्याय ॥ध्रु.॥ वेठी धरिल्या दावी भाव । मागें पळायाचा पाव ॥२॥ काजव्याच्या ज्योती । तुका म्हणे न लगे वाती ॥३॥