भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोलाचें आयुष्य वेचुनियां जाय । पूर्वपुण्यें होय लाभ याचा

molachen ayushya vechuniyan jay | purvapunyen hoy labh yacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मोलाचें आयुष्य वेचुनियां जाय । पूर्वपुण्यें होय लाभ याचा ॥१॥ अनंतजन्मींचे शेवट पाहतां । नर देह हातां आला तुझ्या ॥ध्रु.॥ कराल ते जोडी येईंल कार्यासी । ध्यावें विठ्ठलासी सुखालागीं ॥२॥ सांचलिया धन होईंल ठेवणें । तैसा नारायण जोडी करा ॥३॥ करा हरीभक्ती परलोकीं ये कामा । सोडवील यमापासोनियां ॥४॥ तुका म्हणे करा आयुष्याचें मोल । नका वेचूं बोल नामेंविण ॥५॥