भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोल वेचूनियां धुंडिती सेवका । आम्ही तरी फुका मागों बळें

mol vechuniyan dhunditi sevaka | amhi tari phuka magon balen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मोल वेचूनियां धुंडिती सेवका । आम्ही तरी फुका मागों बळें ॥१॥ नसतां जवळी हित फार करूं । जीव भाव धरूं तुझ्या पायीं ॥ध्रु.॥ नेदूं भोग आम्ही आपुल्या शरीरा । तुम्हांसी दातारा व्हावें म्हणून ॥२॥ कीर्ती तुझी करूं आमुचे सायास । तूं का रे उदास पांडुरंगा ॥३॥ तुका म्हणे तुज काय मागों आम्ही । फुकाचे कां ना भी म्हणसी ना ॥४॥