भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोक्षाचें आम्हांसी नाहीं अवघड । तो असे उघड गांठोळीस

mokshachen amhansi nahin avaghad | to ase ughad gantholis

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मोक्षाचें आम्हांसी नाहीं अवघड । तो असे उघड गांठोळीस ॥१॥ भक्तीचे सोहळे होतील जीवासी । नवल तेविशीं पुरवितां ॥ध्रु.॥ ज्याचें त्यासी देणें कोण तें उचित । मानूनियां हित घेतों सुखे ॥२॥ तुका म्हणे सुखें देई संवसार । आवडीसी थार करीं माझे ॥३॥