भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोक्ष देवापाशीं नाहीं । लटिक्या घाई विळवतें

moksha devapashin nahin | latikya ghai vilavaten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मोक्ष देवापाशीं नाहीं । लटिक्या घाई विळवतें ॥१॥ काय खरें न धरी शुद्धी । गेली बुद्धी भ्रमलें ॥ध्रु.॥ अहंकारास उरलें काई । पांचांठायीं हें वांटे ॥२॥ तुका म्हणे कुंथे भारें । लटिकें खरें मानुनियां ॥३॥