भजनी मालिका
← भजनांकडे परत

मीच माझा डोळा मीच शून्यांत निळा

mich majha dola mich shunyant nila

मीच माझा डोळा मीच शून्यांत निळा । माझा मी वेगळा तयामध्यें ॥१॥ उफराटी दृष्टी लावितां नयनीं । ते दृष्टीची वाणी किंचित ऐका ॥२॥ उफराटी दृष्टि देखे उन्मनीवरी । तेव्हां निर्विकारी मीच मग ॥३॥ ज्ञानदेव म्हणे देहा डोळां दिठी । पाहातां सर्व सृष्टि निवृत्ती एका ॥४॥