भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी त्यांसी अनन्य तीं कोणा असती । ऐसें तंव चित्तीं विचारावें

mi tyansi ananya tin kona asati | aisen tanv chittin vicharaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मी त्यांसी अनन्य तीं कोणा असती । ऐसें तंव चित्तीं विचारावें ॥१॥ आहे तो विचार आपणयापाशीं । कळा बिंबाऐसी प्रतिबिंबीं ॥ध्रु.॥ शुभ शकून तो शुभ लाभें फळे । पुढील तें कळे अनुभवें ॥२॥ तुका म्हणे माझा असेल आठव । तैसा माझा भाव तुझ्या पायीं ॥३॥