भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी तो विकलों तुमचिये पायीं । जीवभाव सर्वहि अर्पियेला

mi to vikalon tumachiye payin | jivabhav sarvahi arpiyela

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
मी तो विकलों तुमचिये पायीं । जीवभाव सर्वहि अर्पियेला ॥१॥ माझा मीच झालों उतराई देवा । तुमचें तुम्हीं पाहा आम्हांकडे ॥२॥ नव मास माता वोझें वाहे उदरीं । तैसीच ही परी तुमची माझी ॥३॥ अपत्य आपुलें फिरे देशोदेशीं । ही लाज कोणासी चोखा म्हणे ॥४॥