भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी बोल बोलें तो गेला

mi bol bolen to gela

मी बोल बोलें तो गेला कवण्या ठायां । हें पुसों आलों लवलह्यां वो । कव्हणि न सांगति मागूं धावें काह्या । आतां लाजिलें ऐशा स्त्रेहागे माये ॥१॥ चला कांवो मज आडोनी । रुप पाहोंद्या कां माझें मजलागुनी । वेडावलें मज देखुनी । शेखीं मी माझें गेलें हारपोनिगे माये ॥२॥ मी बोला आंतु कीं बोल मज आंतु सुखें मुरालें रुप रुपांतुवो । बापरखुमादेविवरु विठ्ठलासि येकांतु । आतां पुरला अंतु । दुजेपणागे माये ॥३॥