भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणसी होऊनी निश्चिंता । हरूनियां अवघी चिंता । मग जाऊं एकांता भजन करूं । संसारसंभ्रमें आशा लागे पाठी । तेणें जीवा साटी होईल तुझ्या

mhanasi houni nishchinta | haruniyan avaghi chinta | mag jaun ekanta bhajan karun | sansarasambhramen asha lage pathi | tenen jiva sati hoil tujhya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
म्हणसी होऊनी निश्चिंता । हरूनियां अवघी चिंता । मग जाऊं एकांता भजन करूं । संसारसंभ्रमें आशा लागे पाठी । तेणें जीवा साटी होईल तुझ्या ॥१॥ सेकीं नाडसील नाडसील । विषयसंगें अवघा नाडसील । मागुता पडसील भवडोहीं ॥ध्रु.॥ शरीर सकळ मायेचा बांधा । यासी नाहीं कदा अराणूक । करिती तडातोडी आंत बाह्यात्कारीं । ऐसे जाती चारी दिवस वेगीं ॥२॥ मोलाची घडी जाते वांयांविण । न मिळे मोल धन देतां कोंडी । जागा होई करीं हिताचा उपाय । तुका म्हणे हाय करिसी मग ॥३॥