भजनी मालिका
← भजनांकडे परत

मेळउनि सकळ गोपाळ । कांहीं करिती विचार

melauni sakal gopal | kanhin kariti vichar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मेळउनि सकळ गोपाळ । कांहीं करिती विचार ॥१॥ चला जाऊं चोरूं लोणी । आजि घेऊं चंद्रधणी । वेळ लावियेला अझुणी । एकाकरितां गडे हो ॥ध्रु.॥ वाट काढिली गोविंदीं । मागें गोपाळांची मांदी ॥२॥ अवघा चि वावरे । कळों नेदी कोणा फिरे ॥३॥ घर पाहोनि एकांताचें । नवविधा नवनीताचें ॥४॥ रिघे आपण भीतरी । पुरवी माथुलियाच्या हरी ॥५॥ बोलों नेदी म्हणे स्थिर । खुणा दावी खा रे क्षीर ॥६॥ जोगवल्या वरी । तुका करितो चाकरी ॥७॥