भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायिक हे सृष्टि कल्पिक जाहली

mayik he srushti kalpik jahali

मायिक हे सृष्टि कल्पिक जाहली । अनादि घडली जाणिजेसु ॥१॥ देहभास नित्य नूतन भासती । शुद्ध स्वयं ज्योति जुनाटची ॥२॥ माया अविद्या दोन्ही उपाधि करूनी । जीवशीव दोन्ही भिन्न जाले ॥३॥ अनादि अज्ञान बंध नये यासी । गुरुकृपा त्यासी छेदिजे की ॥४॥ अनुभवयोगें जाणुनी ज्ञानेश्वरहा भवसागर उतरला ॥५॥