भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायारूपें ऐसें मोहिलेंसे जन । भोगिती पतन नानाकर्में

mayarupen aisen mohilense jan | bhogiti patan nanakarmen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मायारूपें ऐसें मोहिलेंसे जन । भोगिती पतन नानाकर्में ॥१॥ काय याची प्रीती करितां आदर । दुरावितां दूर तें चि भलें ॥ध्रु.॥ नाना छंदे अंगीं वसती विकार । छळियेले फार तपोनिधि ॥२॥ तुका म्हणे ऐसें सिकवितों तुज । आतां धरी लाज मना पुढें ॥३॥