भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायझवा खर गाढवाचें बीज । तें ऐसें सहज कळों येतें

mayajhava khar gadhavachen bij | ten aisen sahaj kalon yeten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मायझवा खर गाढवाचें बीज । तें ऐसें सहज कळों येतें ॥१॥ आपमानिलें जेणें श्रेष्ठाचें वचन । ते चि त्याची खुण ओळखावी ॥ध्रु.॥ मद्यपीतो पुरा अधम जातीचा । तया उपदेशाचा राग वांयां ॥२॥ तुकयाबंधु म्हणे पिसाळलें सुनें । आप पर तेणें न विचारावें ॥३॥