भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायबापें सांभाळिती । लोभाकारणें पाळिती

mayabapen sambhaliti | lobhakaranen paliti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मायबापें सांभाळिती । लोभाकारणें पाळिती ॥१॥ तैसा नव्हे देवराव । याचा कृपाळु स्वभाव ॥ध्रु.॥ मनासारिखें न होतां । बाळकासी मारी माता ॥२॥ तुका म्हणे सांगूं किती । बाप लेंकासी मारिती ॥३॥