भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायबापें जरी सर्पीण कि बोका । त्यांचे संगें सुखा न पवे बाळ

mayabapen jari sarpin ki boka | tyanche sangen sukha na pave bal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मायबापें जरी सर्पीण कि बोका । त्यांचे संगें सुखा न पवे बाळ ॥१॥ चंदनाचा शूळ सोनियाची बेडी । सुख नेदी फोडी प्राण नाशी ॥२॥ तुका म्हणे नरकीं घाली अभिमान । जरी होय ज्ञान गर्व ताठा ॥३॥