भजनी मालिका
← भजनांकडे परत

माया तें चि ब्रम्ह ब्रम्ह तेंचि माया । अंग आणि छाया तया परी

maya ten chi bramha bramha tenchi maya | ang ani chhaya taya pari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माया तें चि ब्रम्ह ब्रम्ह तेंचि माया । अंग आणि छाया तया परी ॥१॥ तोडितां न तुटे सारितां निराळी । लोटांगणांतळीं हारपती ॥ध्रु.॥ दुजें नाहीं तेथें बळ कोणासाठीं । आणिक ते आटी विचाराची ॥२॥ तुका म्हणे उंच वाढे उंचपणें । ठेंगणीं लवणें जैसीं तैसीं ॥३॥