भजनी मालिका
← भजनांकडे परत

माया साक्षी आम्ही नेणों भीड भार । आप आणि पर नाहीं दोन्ही

maya sakshi amhi nenon bhid bhar | ap ani par nahin donhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माया साक्षी आम्ही नेणों भीड भार । आप आणि पर नाहीं दोन्ही ॥१॥ सत्याचिये साठी अवघा चि भरे । नावडे व्यापार तुटीचा तो ॥ध्रु.॥ पोंभाळिता चरे अंतरींचें दुःख । लांसें फांसें मुख उघडावें ॥२॥ तुका म्हणे नव्हे स्फीतीचा हा ठाव । निवाड्यासी देव साक्षी केला ॥३॥