भजनी मालिका
← भजनांकडे परत

माया मोहोजाळीं होतों सांपडला । परि या विठ्ठला कृपा आली

maya mohojalin hoton sampadala | pari ya viththala krupa ali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माया मोहोजाळीं होतों सांपडला । परि या विठ्ठला कृपा आली ॥१॥ काढूनि बाहेरि ठेविलों निराळा । कवतुक डोळां दाखविलें ॥ध्रु.॥ नाचे उडे माया करी कवतुक । नाशवंत सुखें साच केलीं ॥२॥ रडे फुंदे दुःखें कुटितील माथा । एकासी रडतां तें ही मरे ॥३॥ तुका म्हणे मज वाटतें नवल । मी माझे बोल ऐकोनियां ॥४॥