भजनी मालिका
← भजनांकडे परत

माया मोहोजाळे गुंतलोंसे बळें । यांतोनी वेगळें करीं गा देवा

maya mohojale guntalonse balen | yantoni vegalen karin ga deva

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
माया मोहोजाळे गुंतलोंसे बळें । यांतोनी वेगळें करीं गा देवा ॥१॥ न कळेचि स्वार्थ अथवा परमार्थ । बुडालोंसे निभ्रांत याचमाजी ॥२॥ न घडे देवार्चन संतांचें पूजन । मन समाधान कधीं नव्हे ॥३॥ नसतेचि छंद लागती अंगासी । तेणें कासावीस जीव होय ॥४॥ चोखा म्हणे याही चोरें नागविलों । माझा मीचि झालो शत्रु देवा ॥५॥