भजनी मालिका
← भजनांकडे परत

मत्स्यकूर्मशेषा कोणाचा आधार । पृथ्वीचा भार वाहावया

matsyakurmashesha konacha adhar | pruthvicha bhar vahavaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मत्स्यकूर्मशेषा कोणाचा आधार । पृथ्वीचा भार वाहावया ॥१॥ काय धाक आम्हां कासयाची चिंता । ऐसा तो असतां साहाकारी ॥ध्रु.॥ शंखचक्रगदा आयुधें अपार । वागवितो भार भक्तांसाठी ॥२॥ पांडवां जोहरी राखिलें कुसरी । तो हा बंधुचा कैवारी तुकयाच्या ॥३॥