भजनी मालिका
← भजनांकडे परत

मथुरेच्या राया । माझें दंडवत पायां

mathurechya raya | majhen dandavat payan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मथुरेच्या राया । माझें दंडवत पायां ॥१॥ तुमचे कृपेचें पोसनें । माझा समाचार घेणें ॥ध्रु.॥ नाम धरिलें कंठीं । असें आर्तभूत पोटीं ॥२॥ जीवींचें ते जाणा । तुका म्हणे नारायणा ॥३॥