भजनी मालिका
← भजनांकडे परत

मातेविण बाळा । आणिक न माने सोहळा

matevin bala | anik na mane sohala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मातेविण बाळा । आणिक न माने सोहळा ॥१॥ तैसें जालें माझ्या चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥ध्रु.॥ वाट पाहेमेघा बिंदु । नेघे चातक सरिता सिंधू ॥२॥ सारसांसी निशीं । ध्यानरवीच्या प्रकाशीं ॥३॥ जीवनाविण मत्स्य । जैसें धेनूलागीं वत्स ॥४॥ पतिव्रते जिणें । भ्रताराच्या वर्त्तमानें ॥५॥ कृपणाचें धन । लोभालागीं जैसें मन ॥६॥ तुका म्हणे काय । तुजविण प्राण राहे॥७॥