भजनी मालिका
← भजनांकडे परत

मातेचीं जो थानें फाडी । तया जोडी कोण ते

matechin jo thanen phadi | taya jodi kon te

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मातेचीं जो थानें फाडी । तया जोडी कोण ते ॥१॥ वेदां निंदी तो चांडाळ । भ्रष्ट सुतकिया खळ ॥ध्रु.॥ अगी लावी घरा । मग वसती कोठें थारा ॥२॥ तुका म्हणे वर्म । येरा नाचवितो भ्रम ॥३॥