भजनी मालिका
← भजनांकडे परत

मातेची अवस्था काय जाणे बाळ । तिसी तों सकळ चिंता त्याची

matechi avastha kay jane bal | tisi ton sakal chinta tyachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मातेची अवस्था काय जाणे बाळ । तिसी तों सकळ चिंता त्याची ॥१॥ ऐसें परस्परें आहे चि विचारा । भोपळ्याचा तारा दगडासी ॥ध्रु.॥ भुजंग पोटाळी चंदनाचें अंग । निवे परि संगे नव्हे तैसा ॥२॥ तुका म्हणे करा परिसाचे परी । मज ठेवा सरी लोखंडाचे ॥३॥