भजनी मालिका
← भजनांकडे परत

माते आधि कन्या जन्म पावली तिच्या

mate adhi kanya janma pavali tichya

माते आधि कन्या जन्म पावली तिच्या वर्‍हाडा आईति केली । पाहों गेलों तये चरण ना तुम्ही नेत्र संपुर्ण लक्षणें वोळखिलीं । नवरा गर्भवासि पहिले नामरसी घटित आहे दोघांसीं । अर्थ याचा सांगा श्रोते हो लग्नेविण आणिली घरासिरेरे ॥१॥ कवण कवणाचा विचारु करा उपजत पुत्र म्हातारा युगें गेली तया जाहलिया जन्म ऐसें एक अवधारा ॥२॥ पुत्रें मातेसि पय पाजिलें कीं पितयासी कडे वाहिलें । तुम्ही म्हणाल शास्त्रें काय देखिलें तरी उजुचि आहे बोलिलें । शास्त्र गूढ अध्यात्म गूढ वज्र गूढी पाहे म्हणितलेरेरे ॥३॥ साहिशास्त्रें शिणलीं भारी परि अर्थ नकळे कवण्यापरी । सुजाण श्रोते कविजन अपार कवित्त्व करिती लक्षवरी । एक एक कवित्त्वीं हें काय नवल ज्ञानदेवीं पाहिलें निरुतेरेरे ॥४॥