भजनी मालिका
← भजनांकडे परत

मासं चर्म हाडें । देवा अवघीं च गोडें

masan charma haden | deva avaghin cha goden

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मासं चर्म हाडें । देवा अवघीं च गोडें ॥१॥ जे जे हरीरंगीं रंगले । कांहीं न वचे वांयां गेले ॥ध्रु.॥ वेद खाय शंखासुर । त्याचें वागवी कलेवर ॥२॥ तुका म्हणे ऐसा । बराडी हा भक्तीरसा॥३॥