भजनी मालिका
← भजनांकडे परत

मंत्र चळ पिसें लागतें सत्वर । अबद्ध ते फार तरले नामें

mantra chal pisen lagaten satvar | abaddha te phar tarale namen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मंत्र चळ पिसें लागतें सत्वर । अबद्ध ते फार तरले नामें ॥१॥ आशौच तो बाधी आणिकां अक्षरां । नाम निदसुरा घेतां तरे ॥ध्रु.॥ रागज्ञानघात चुकतां होय वेळ । नाम सर्वकाळ शुभदायक॥२॥ आणिकां भजना बोलिला निषेध । नाम तें अभेद सकळां मुखीं ॥३॥ तुका म्हणे तपें घालिती घालणी । वेश्या उद्धरूनि नेली नामें ॥४॥