भजनी मालिका
← भजनांकडे परत

मंगळमूर्ति तूं किं मनाचिया लावण्यवाणा

mangalamurti tun kin manachiya lavanyavana

मंगळमूर्ति तूं किं मनाचिया लावण्यवाणा । वेधी वेधक तूं सहजगुणा । सगुण निर्गुण न कळे तुझें विंदान । कैसें आपचि पर दाटुन रिगसि ॥ तेथें नवलाव वर्णु काय कोण रया ॥१॥ वर्णितां तुझे गुण मना मौन्य पडे । कळिकाळ बापुडें काय करिल आह्मां ॥२॥ ध्यानमूर्ति तुझी मनें अळंकारली मनामाजी संचरली । संचरता इंद्रियें समानपदीं तुजविण न दिसे आन बोली । तेथें भिन्नाभिन्नपणीं कोणा पाहों दातारा दिठी सुखाचेनि सुखें स्थिरावली रया ॥३॥ बापरखुमादेविवराविठ्ठले वोतप्रोत सधन नावेक नुरे कांहींएक केलें । तुझें तुज गर्‍हाणें किती देऊं दातारा बोलवितां नव्हे भले रया ॥४॥