भजनी मालिका
← भजनांकडे परत

मंगळाचा मंगळ सांटा । विट तोटा नेणे तें

mangalacha mangal santa | vit tota nene ten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मंगळाचा मंगळ सांटा । विट तोटा नेणे तें ॥१॥ हें भरा सातें आलें । भलें भलें म्हणवावें ॥ध्रु.॥ जनीं जनार्दन वसे । येथें दिसे तें शुद्ध ॥२॥ तुका म्हणे बहुतां मुखें । खरें सुखें ठेवावें ॥३॥