भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन जालें भाट । कीर्ती मुखें घडघडाट । पडियेली वाट । ये चि चाली स्वभावें

man jalen bhat | kirti mukhen ghadaghadat | padiyeli vat | ye chi chali svabhaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मन जालें भाट । कीर्ती मुखें घडघडाट । पडियेली वाट । ये चि चाली स्वभावें ॥१॥ बोलें देवाचे पवाडे । नित्य नवे चि रोकडे । ज्या परी आवडे । तैसा तैसा करूनि ॥ध्रु.॥ रोखीं रहावें समोर । पुढें मागें चाले भार । करावें उत्तर । सेवा रुजू करूनि ॥२॥ पूर वर्षला देकारें । संतोषाच्या अभयें करें । अंगींच्या उत्तरें । तुकया स्वामी शृंगारी ॥३॥