भजनी मालिका
← भजनांकडे परत

माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें

makaden muthin dharilen phutane | guntale te nene hat tethen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥१॥ काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥ शुकें नळिकेशीं गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥२॥ तुका म्हणे एक ऐसे पशुजीव । न चले उपाव कांहीं तेथें ॥३॥