भजनी मालिका
← भजनांकडे परत

मजुराचें पोट भरे । दाता उरे संचला

majurachen pot bhare | data ure sanchala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मजुराचें पोट भरे । दाता उरे संचला ॥१॥ या रे या रे हातोहातीं । काय माती सारावी ॥ध्रु.॥ रोजकीदव होतां झाडा । रोकडा चि पर्वत ॥२॥ तुका म्हणे खोल पाया । वेचों काया क्लेशेसीं ॥३॥