भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझ्या कपाळाच्या गुणें । किंवा सरलेंसे नेणें

majhya kapalachya gunen | kinva saralense nenen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझ्या कपाळाच्या गुणें । किंवा सरलेंसे नेणें ॥१॥ नये वचन बाहेरी । उभें तिष्ठतसें दारीं ॥ध्रु.॥ काय सांगायास वेचे । रीते आरंभीं ठायींचे ॥२॥ तुका म्हणे किती । भीड धरावी पुढती ॥३॥