भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझिया मनाची बैसली आवडी । अवसान घडी एकी नेघे

majhiya manachi baisali avadi | avasan ghadi eki neghe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझिया मनाची बैसली आवडी । अवसान घडी एकी नेघे ॥१॥ पाय चित्तीं रूप डोळांच राहिलें । चिंतने गोविलें मुख सदा ॥ध्रु.॥ अवघियांचा झाला विसर हा मागें । वेध हा श्रीरंगें लावियेला ॥२॥ तुका म्हणे कानीं आइकली मात । तोचि झाला घात जीवपणा ॥३॥