भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझिया देहाची मज नाहीं चाड । कोठें करूं कोड आणिकांचें

majhiya dehachi maj nahin chad | kothen karun kod anikanchen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझिया देहाची मज नाहीं चाड । कोठें करूं कोड आणिकांचें ॥१॥ इच्छतां ते मान मागा देवापासीं । आसा संचितासी गुंतले हो ॥ध्रु.॥ देह आम्ही केला भोगाचे सांभाळीं । राहिलों निराळीं मानामानां ॥२॥ तुका म्हणे कोणें वेचावें वचन । नसतां तो सीण वाढवावा ॥३॥