भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझी सर्व चिंता आहे विठोबासी । मी त्याच्या पायांसी न विसंभें

majhi sarva chinta ahe vithobasi | mi tyachya payansi na visambhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझी सर्व चिंता आहे विठोबासी । मी त्याच्या पायांसी न विसंभें ॥१॥ विसरणे रूप क्षण एक चित्तीं । जिवलग मूर्ती सांवळी ते ॥ध्रु.॥ विसरतां हरी क्षण एक घडी । अंतरली जोडी लक्षलाभ ॥२॥ तुका म्हणे माझ्या विठोबाचे पाये । संजीवनी आहे हृदयामाजी ॥३॥