भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझी आतां लोक सुखें निंदा करू । म्हणती विचारू सांडियेला

majhi atan lok sukhen ninda karu | mhanati vicharu sandiyela

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझी आतां लोक सुखें निंदा करू । म्हणती विचारू सांडियेला ॥१॥ कारण होय तो करावा विचार । काय भीड भार करूं देवा ॥ध्रु.॥ तुका म्हणे काय करूं लापनिक । जनाचार सुख नासिवंत ॥२॥