भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें मज द्यावें । नाहीं करवीत नवें

majhen maj dyaven | nahin karavit naven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझें मज द्यावें । नाहीं करवीत नवें ॥१॥ सहस्रनामाचें रूपडें । भक्त कैवारी चोखडें ॥ध्रु.॥ साक्षीविण बोलें । तरी मज पाहिजे दंडिलें ॥२॥ तुका म्हणे माल । माझा खरा तो विठ्ठल ॥३॥