भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें आराधन । पंढरपुरींचें निधान

majhen aradhan | pandharapurinchen nidhan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझें आराधन । पंढरपुरींचें निधान ॥१॥ तया एकाविण दुजें । कांहीं नेणें पंढरीराजें ॥ध्रु.॥ दास विठ्ठलाचा । अंकित अंकिला ठायींचा ॥२॥ तुका म्हणे आतां । नव्हे पालट सर्वथा ॥३॥