भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे विषयीं तुज पडतो विसर । नको धरूं दूर पांडुरंगा

majhe vishayin tuj padato visar | nako dharun dur panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझे विषयीं तुज पडतो विसर । नको धरूं दूर पांडुरंगा ॥१॥ तुझा म्हणवितों हे चि लाज तुला । आतां झणी मला विसरेसी ॥२॥ तुका म्हणे तुझी माझी नाहीं उरी । आतां केली खरी देवराया ॥३॥